loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांकडून चिवला बीच येथे स्वच्छता मोहीम

मालवण(प्रतिनिधी)- मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि वनशक्ती, इंडिया यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त चिवला समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि किनारी स्वच्छतेचा संदेश देत या अभियानात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाविद्यालयातील ३३ एनएसएस स्वयंसेवक आणि ६ प्राध्यापकांनी या अभियानात सहभाग घेत चिवला समुद्रकिनारा व परिसरातील प्लास्टिक तसेच इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास राबते आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे, कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच सागरी व किनारी परिसंस्थेचे संवर्धन याबाबत विद्यार्थी आणि स्थानिक समुदायामध्ये जनजागृती करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. सामूहिक सहभागातून स्वयंसेवकांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे एनएसएस स्वयंसेवकांना पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच किनारी परिसराचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत व पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

टाइम्स स्पेशल

यावेळी डॉ. हंबीरराव चौगले यांनी विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व आणि त्याच्या योग्य पद्धतीची माहिती दिली. डॉ. संकेत बेळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, सोहम भोगले, मयुरेश कदम, क्रांती पालव आणि वैभवी गावडे या संयोजन समितीने परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg