संगमेश्वर (सत्यवान विचारे) : कोकणच्या ग्रामीण भागातून कुस्तीच्या आखाड्यात उतरलेल्या आलोक पोमेंडकर याने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर जिल्हास्तरावरही अव्वल ठरत आलोकने आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कुस्तीचा फारसा वारसा नसलेल्या कोकणातील ग्रामीण भागातून आलेल्या आलोकने दोन वर्षांपूर्वी कुस्तीचा सराव सुरू केला. सुरुवातीपासूनच या खेळाकडे गांभीर्याने पाहत त्याने सातत्याने सराव, मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याचा परिणाम म्हणून प्रथम तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळाले आणि आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कामगिरीची दखल घ्यायला भाग पाडले आहे.
कुस्तीपुरतेच आलोकचे क्रीडा कौशल्य मर्यादित नाही. यापूर्वी त्याने गोळाफेक आणि हातोडाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कबड्डी आणि क्रिकेटमध्येही तो सक्रिय असून, विविध स्पर्धांमध्ये आपल्या खेळाची चमक दाखवत आला आहे. आलोकने यापूर्वी कारभाटले हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. सध्या तो कसबा हायस्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच आपल्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना सातत्याने जोपासत आहे.
विशेष म्हणजे आलोक केवळ मैदानावरच नव्हे, तर शाळेतील विविध उपक्रमांमध्येही आघाडीवर असतो. त्याचे सुंदर हस्ताक्षर असून शाळेतील विविध कार्यक्रमांचे फलक लेखन, सण-उत्सवांच्या निमित्ताने करण्यात येणारे लेखन आदी उपक्रमांमध्येही तो कौशल्य दाखवतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्रीडा गुणवत्ता आहे, हे आलोकच्या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही त्याने चमकदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.