loader
Breaking News
Breaking News
Foto

आज रत्नागिरीत मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा बक्षिस वितरण सोहळा वाजत गाजत, बाप्पा मोरयाचा जयघोष करीत येण्याचे आवाहन

रत्नागिरी, - अवघ्या महाराष्ट्रात प्रतिष्ठाप्राप्त ठरलेल्या ‘श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या ‘श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा आज रवि. दि. २७ सप्टें. रोजी सायं. ठिक ४ वा. मराठा भवन हॉल, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व पारितोषिक विजेत्यांनी, स्पर्धकांनी व गणेश भक्तांनी वाजत गाजत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत यावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान‘च्या या सजावट स्पर्धांचे हे ३४ वे वर्ष होय. सालाबाद प्रमाणे यावर्षीही मंगलमूर्ती स्पर्धा नेहमीप्रमाणे नियोजनबध्द पध्दतीने संपन्न झाल्या. यावेळीही या स्पर्धा घरगुती गणेशोत्सव, जिल्हास्तरीय सार्व. गणेशोत्सव व मंगलमूर्ती मिरवणूक स्पर्धा अशा ३ विभागात संपन्न झाल्या. त्यासाठी विविध परिक्षक मंडळे स्थापन करण्यात आली होती. या स्पर्धांचे कार्य पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार अतिशय शिस्तबध्द व नियोजनपूर्वक पार पडते तशाच पध्दतीने यावर्षीही या स्पर्धा अमाप उत्साहात शिस्तबध्दरित्या संपन्न झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा आज रवि. दि. २७ सप्टें. रोजी सायं. ठिक ४ वा. मराठा भवन हॉल, माळनाका, रत्नागिरी येथे संपन्न होईल. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच धडाडीचे आमदार किरण सामंत, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच या सोहळ्याला रत्नागिरीचे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्य. अधिकारी सौ. वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी श्री. जीवन देसाई व स्वरूपानंद पतसंस्थेचे चेअरमन तथा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दिपक पटवर्धन असे मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यावर्षीच्या स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

या पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रसंगी मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते स्पर्धेतील सर्व पारितोषिक विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देवून त्यांचा व त्यांच्या कलेचा गौरव करण्यात येणार आहे. तरी या पारितोषिक वितरण सोहळ्याला सर्व गणेश भक्तांनी, पारितोषिक विजेत्यांनी, हितचिंतकांनी व गणेश प्रेमींनी सहकुटुंब सहपरिवार, मित्रमंडळींसह वाजत गाजत, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत जल्लोषात यावे आणि ‘श्रीं’च्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर, संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये, श्री. दिपक राऊत, श्री. संदीप डोंगरे, श्री. विनायक हातखंबकर, अ‍ॅड. विनय आंबुलकर, श्री. संजय वैशंपायन, श्री. राजेंद्र नेरकर, श्री. राकेश चव्हाण यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg