loader
Breaking News
Breaking News
Foto

विश्व संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण आयोगाकडून डॉ. दिनेश नागवेकर यांचा बहुमान; मानद डॉक्टरेट पदवी प्रदान!

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी येथील सनदी अभियंता, राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेजचे स्थापत्य अभियांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निवृत्त शिक्षक, स्थावर संपदा विकासक आणि सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांची ‘विश्व संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण आयोगा’कडून राष्ट्रीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासोबतच, आयोगाच्या वतीने अभियांत्रिकी आणि स्थावर संपदा या विषयातील योगदानाबद्दल डॉ. नागवेकर यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शेती शास्त्र विभागाच्या सभागृहात हा भव्य पदवीदान समारंभ पार पडला.

टाइम्स स्पेशल

डॉ. दिनेश नागवेकर हे पर्यावरण शास्त्र संस्था तसेच भारतीय सौर ऊर्जा संस्थेचे आजीवन सदस्य असून, देशातील विविध २१ संस्थांचे आजीवन सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही निवड आयोगाचे अध्यक्ष एस. के. सिन्हा, डायरेक्टर इंजिनिअर अभिमन्यू सिन्हा आणि निवड समितीने केली आहे. तसेच स्वतःच्या वाहनावर आयोगाचे चिन्ह (लोगो) वापरण्याचा हक्कही डॉ. नागवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. नागवेकर यांच्या या यशामुळे सावंतवाडीसह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg