loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणबी समाजातील अनिष्ट प्रथा व अवाजवी खर्चाला आळा घालण्यासाठी लवेल विभागाची सभा उत्साहात

लवेल, (बाळू सनगरे) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या मार्गदर्शनाखाली कुणबी समाजोन्नती खेड मुंबई व ग्रामीण, कुणबी युवा खेड आणि कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जून २०२६ रोजी झालेल्या कुणबी समाज परिषदेतील ठरावांच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय जनजागृती सभांना सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवेल विभागाची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत समाजामध्ये आजही प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा, कालबाह्य रूढी, परंपरा तसेच लग्नसमारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या अनावश्यक आणि अवाजवी खर्चाला आळा घालण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या निर्णयांची अंमलबजावणी केवळ परिषदेपुरती मर्यादित न राहता तळागाळापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विभागनिहाय सभा घेतल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लवेल विभागाच्या सभेत समाजबांधवांनी आपली मते मांडताना विवाह सोहळे आणि विविध समारंभांमधील वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार पडत असल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेसाठी केला जाणारा अनावश्यक खर्च टाळून साधेपणा, बचत आणि विधायक विचारांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच तरुण पिढीला शिक्षण, रोजगार, व्यवसाय, स्पर्धा परीक्षा यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, महिलांचा सामाजिक व आर्थिक सहभाग वाढविणे आणि समाजातील एकोपा मजबूत करणे या विषयांवरही चर्चा झाली.

टाईम्स स्पेशल

केवळ ठराव करून चालणार नाही, तर प्रत्येक समाजबांधवाने त्याची जबाबदारी स्वीकारून अनिष्ट प्रथा बंद करून सकारात्मक आणि प्रगतिशील बदल घडवून आणण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला. या सभेला लवेल विभागातील विविध गावांमधील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या हितासाठी सुरू असलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनावश्यक खर्च कमी करून भविष्यातील पिढीच्या शिक्षण आणि प्रगतीसाठी संसाधने वापरण्याचा संदेश यातून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg