दापोली (प्रतिनिधी) : महाळुंगे कदमवाडी येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन एस.टी. बस थांब्याची उभारणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांची, विशेषतः नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लोकवर्गणीतून एस. टी. बस थांबा सुरू केला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख दत्ताराम कालेकर, शिवसेना महिला आघाडी उप संघटिका शुभांगी खोचरे, बिपिन ऊर्फ अप्पी मोरे, खेर्डी पंचायत समिती गणाचे विभाग प्रमुख उदय इंदुलकर, महाळुंगे शाखा प्रमुख राजेश तुकाराम गोलांबडे, उप शाखा प्रमुख प्रसाद कदम व प्रदीप गोलांबडे, बूथ प्रमुख अक्षय गोलांबडे, निखिल गोलांबडे, राज गोलांबडे, निपेश गोरीवले, ओंकार मांडवकर, महीपतबाबा कदम, महाळुंगे कदमवाडी अध्यक्ष रामचंद्र कदम, कमलेश कदम, सुनील कदम, महेश कदम, सुधीर कदम, दत्ताराम कदम, बाळाराम गोरीवले, बळीराम पवार, संदिप पांडुरंग गोलांबडे, महीपत धाडवे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर नवरत, सुजाता गंगाराम कदम, करंजाणी शाखाप्रमुख अरुण कालेकर, उप शाखा प्रमुख प्रफुल कालेकर, हातीप शिवसेना शाखाप्रमुख रवींद्र वारणकर, दीपक राणे, अनंत गोरीवले तसेच महाळूंगे गावातील व कदमवाडी परिसरातील नागरिक तसेच शिवसैनिक बंधु-भगिनी-मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाळुंगे आणि परिसरातील नागरिकांना आता लांबचा प्रवास करण्यासाठी मुख्य मार्गावरील थांब्यांवर जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्तरावरच लालपरी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि खाजगी वाहनांसाठी करावा लागणारा अतिरिक्त खर्च टळेल. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हक्काचा आणि सुरक्षित अधिकृत असा एस.टी. बस थांबा उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या वतीने या थांब्यावर प्रवाशांना उन्हा-पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून एस टी बस थांब्यात बसण्याची व्यवस्था आणि माहिती फलक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या सामाजिक कामाचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.