loader
Breaking News
Breaking News
Foto

विरार,गासकोपरी काटई राजाला बाप्पाला भावपूर्ण निरोप

विरार (प्रतिनिधी) - संयुक्त मित्र मंडळ, विरार, गासकोपरी काटई यांच्या विद्यमाने सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिनरात्र अथक मेहनत घेतली. हा सोहळा विविध अंगाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी या मंडळाचे व्यवस्थापक तथा सभापती यज्ञेश्वर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखालीच मंडळाने उत्सवाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तब्बल 12 दिवस काटईचा राजा गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात आली. हजारो भक्त गणांनी दररोज पूजा अर्चा, आरती आणि दर्शनाचा लाभ घेतला. केवळ धार्मिक विधीच नव्हे तर या मंडळातर्फे भक्तांसाठी विविध सांस्कृतिक सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदी आणि चैतन्य वातावरण निर्माण झाले होते. गासकोपरी काटई राजाची ख्याती आज संपूर्ण परिसरात पसरली असून हा गणपती नवसाला पावणारा म्हणून भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे.

टाईम्स स्पेशल

बारा दिवसांच्या या जल्लोषनंतर अखेर बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली.विसर्जनाच्या दिवशी सभापती यज्ञेश्वर पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत आरती घेण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, जयघोषात भव्य मिरवणुकीने बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संयुक्त मंडळाचे पदाधिकारी व उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg