loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचा राजा विसर्जन मिरवणुकीत दिवंगत नईम चौगुले यांच्या आठवणीला उजाळा!

खेड - भारतीय जनता पक्ष आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित ‘खेडचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. ढोल-ताशांचा गजर आणि गणरायाच्या जयघोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत यंदा एका भावनिक प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात नईम चौगुले यांचे निधन झाले होते. खेडचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते एडवोकेट वैभव खेडेकर यांचे खंदे समर्थक म्हणून नईम चौगुले यांची ओळख होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच नईम चौगुले यांचे कटआउट ‘खेडचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत झळकताना दिसले. आपल्या कार्यकर्त्याच्या निधनानंतरही त्यांची आठवण जपण्यात आल्याने मिरवणुकीत उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष या कटआउटकडे वेधले गेले. नईम चौगुले यांच्या आकस्मिक निधनाची आठवण या निमित्ताने पुन्हा एकदा जागी झाली. कार्यकर्ता हयात नसतानाही त्याच्या आठवणीला सार्वजनिक व्यासपीठावर स्थान देण्यात आल्याने वैभव खेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील जिव्हाळ्याच्या नात्याची चर्चा खेड शहरात रंगली.

टाईम्स स्पेशल

गणरायाला निरोप देताना जल्लोषाचे वातावरण असतानाच दिवंगत नईम चौगुले यांच्या कटआउटने अनेकांसाठी हा क्षण भावनिक करून टाकला. एकूणच, यंदाच्या ‘खेडचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाच्या निरोपासोबतच दिवंगत कार्यकर्त्याच्या आठवणीला दिलेला हा उजाळा चर्चेचा विषय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg