loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक कन्या दिनानिमित्त कोन्हवली शाळेतील विद्यार्थिनींचा सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कोन्हवली येथे जागतिक कन्या दिनानिमित्त विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्यार्थिनींचे कौतुक करताना अभिजीत देवळेकर म्हणाले, “मुलगी ही केवळ कुटुंबाची जबाबदारी नसून समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची शक्ती आहे. मुलींना शिक्षण, समान संधी आणि आत्मविश्वास मिळाला तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. कन्यांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना सातत्याने प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

टाईम्स स्पेशल

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पंदिरकर तसेच उपशिक्षक चुनिलाल गोसावी उपस्थित होते. शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg