loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

खेड (प्रतिनिधी) - युवा-युवतींच्या रोजगार, नोकरी आणि जनहक्कांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी खेड नगर वाचनालय, मीनाताई ठाकरे नाट्यगृहाजवळ येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, सचिव श्रीकांत सकपाळ, महाराष्ट्र राज्य खजिनदार ऋषिकेश कानडे, महाराष्ट्र राज्य कार्यालयीन सचिव रामचंद्र कदम आणि महाराष्ट्र राज्य सल्लागार अनिल येसोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत खेड तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच युवा-युवतींचे शिक्षण, रोजगार, नोकरी, कंत्राटी पद्धत, स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधी आणि जनहक्कांच्या प्रश्नांवर आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम व आंदोलने राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवनियुक्त खेड तालुका कार्यकारिणी मिलिंद जाधव — खेड तालुका अध्यक्ष, वैजुद्दीन परकार — खेड तालुका उपाध्यक्ष, विजय पवार — खेड तालुका उपाध्यक्ष, सुनील जाधव — खेड तालुका उपाध्यक्ष, बाबाराम पवार — खेड तालुका कार्याध्यक्ष, विनायक निकम — खेड तालुका मुख्य संघटक, मंगेश खेडेकर — खेड तालुका संघटक, अनिल सदरे — खेड तालुका प्रवक्ते, आनंद कांबळे — खेड तालुका सचिव, वर्षा मस्कर — खेड तालुका सहसचिव, विशाल सागवेकर — खेड तालुका खजिनदार, फारूख मणियार — खेड तालुका सदस्य, राजेंद्र निर्मळ — खेड तालुका सदस्य, कमाल भाई मुकादम — खेड तालुका सदस्य, अरुण सोंडकर — खेड तालुका सदस्य, दत्तात्रय मोरे — खेड तालुका सदस्य, नाजीमा तांबे — खेड तालुका सदस्य, बाळकृष्ण देवळेकर — खेड तालुका सदस्य, सखाराम सकपाळ — खेड तालुका सदस्य, बशीर मुजावर — खेड तालुका सदस्य, चंदा जाधव — खेड तालुका सदस्य, वारीस तांबे — खेड तालुका सदस्य, मंगेश भैरवकर — खेड तालुका सदस्य, सचिन गोविंद खेडेकर — खेड तालुका युवा अध्यक्ष.. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

बैठकीत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शासकीय व निमशासकीय विभागातील रिक्त पदांची नियमित भरती, कंत्राटी पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवून रोजगार व जनहक्कांच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळात खेड तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg