वैभववाडी (प्रतिनिधी) - पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय आत्मसात करावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील नवलादेवी वाडी येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकर्यांशी संवाद साधून पावसातील खंडामुळे शेतीवर झालेल्या परिणामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी लक्ष्मण विठोबा हिवाळकर यांच्या शेतातील भातशेतीची पाहणी केली. शेतकर्यांनी यावेळी पावसाअभावी भातपिकाच्या वाढीवर झालेल्या परिणामांची माहिती पालकमंत्र्यांना दिली. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे भात पिकाला अपेक्षित फुटवे आलेले नाहीत. तसेच भाताचे दाणेही पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याचे शेतकरी लक्ष्मण हिवाळकर यांनी सांगितले. पावसातील खंडाचा परिणाम तालुक्यातील ऊस पिकावरही झाला असून ऊस शेतीचे नुकसान झाल्याची माहिती शेतकर्यांनी दिली. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणात भाताच्या विविध जातींसह उसाच्या शेतीची अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. जुने जाणकार शेतकरीही याची जाणीव करून देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याने प्रत्यक्ष शेतकर्यांशी संवाद साधून आणि बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणे हा या दौर्याचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष पाहणी, शेतकर्यांशी संवाद आणि अनुभवाच्या आधारे मिळालेली माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविली जाईल. केवळ उपलब्ध आकडेवारी किंवा गुगल मॅपच्या आधारे नव्हे, तर प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे शेतकर्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना मदत करण्याची स्पष्ट भूमिका घेतली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याची वस्तुस्थिती शासनासमोर भक्कमपणे मांडून बाधित शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, भाजपा वैभववाडी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, सरपंच लिना पांचाळ, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, पंचायत समिती सदस्य साधना नकाशे, देवानंद पालांडे, मंगेश लोके, नाशिर काझी, महेश संसारे, दिगंबर मांजरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, तसेच जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.