loader
Breaking News
Breaking News
Foto

राजस्थानमधील ४ मोठ्या व्यापार्‍यांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

अहमदाबाद- राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सांचौर आणि भिनमाल परिसरातील रहिवासी असलेले मुंबईत व्यवसायिक आहेत. याच चार मोठ्या व्यापार्‍यांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू झाल्याने व्यापारी जगतात दुःखद छटा पसरली आहे. चौघेही कारने मुंबईहून गुजरातमधील पाटण येथील प्रसिद्ध शंखेश्वर पाश्वनाथ जैन तिर्थस्थळाच्या दर्शनासाठी जात होते. भरधाव कार महामार्गाच्या आपत्कालीन मार्गिकेत उभे असलेल्या डंपरवर जावून आदळले. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला. भिनमालमधील प्रवीण जैन, कोरा गावातील संजय जैन, हाडे गावचे जुनीलाल जैन यांचे पुत्र जयंतीलाल आणि हाडेचा येथील जितमल जैन यांचे पुत्र पोपटलाल अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्याकडे टाटा हॅरिअर कार होती. डिगस गावाच्या हद्दीत तापी नदीच्या पुलाच्या पुढे हा अपघात झाला. मुंबईतील व्यापारी जगतात या चौघांचे मोठे कर्तुत्व होते, त्यामुळे या घटनेचा शोक व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg