केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी मोठ्या आशेने भाताची लावणी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्यामुळे परिसरातील भात शेती पूर्णपणे संकटात सापडली आहे. सध्या भाताचे पीक गर्भात (लोंब्या येण्याच्या स्थितीत) आले असून, याच महत्त्वाच्या टप्प्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती लांजा तालुक्यातील शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जातेय.
तालुक्यात कही ठिकाणी भाते पसवली आहेत, तर काही ठिकाणी लोबींत दाणे तयार होण्याच्या (गर्भपात) आली आहेत. याच वेळेला पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना बसत आहे. शेतात ओलावा राहीलेला नाही भात पीक जेव्हा गर्भाच्या अवस्थेत असते, तेव्हा त्याला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. या काळात शेतात पाणी साठून राहणे आवश्यक असते. परंतु, कडक ऊन आणि पावसाच्या खंडामुळे जमिनीला मोठ-मोठे तडे गेले आहेत. पाण्याचा अंश संपल्यामुळे भाताची पिके पिवळी पडू लागली असून, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे. तर काही भागांत पिके करपून जाण्यास सुरुवात झाली असल्याचे शेतकर्यांतून बोलले जात आहे. शेतकरी चिंतेत पडला आहे.
वर्षभर शेतात राबून वर्षाची धान्याची बेगमी करून ठेवण्यासाठी धान्य मिळेल या आशेपोटी कर्ज, खते, बियाणे आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून शेतकर्यांनी शेती उभी केली. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण मेहनत वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर पुढील दोन ते तीन दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर तालुक्यातील भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती स्थानिक शेतकर्यांतून व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, प्रशासनाने तात्काळ या भागातील पिकांची पहाणी करून शेतकर्यांना आर्थिक मदत किंवा पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.