loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीत शिक्षकांचे मोठे योगदान - उपसभापती निलेश सुर्वे

वरवेली (गणेश किर्वे) - जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्तेमध्ये बाजी मारली आहे. शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उपसभापती नीलेश सुर्वे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीसाठी पंचायत समिती व नवनीत फाऊंडेशन शिक्षक प्रशिक्षण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चिखली शाळेत आयोजित शिक्षकांसाठीच्या गणित समृद्धीकरण कार्यशाळेत ते बोलत होतेपंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती सुर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील शिक्षकांना कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी चौथी व सातवी शिष्यवृत्तीबाबतही मार्गदर्शन आले.

टाईम्स स्पेशल

तालुक्यातील २० केंद्रांतील निवडक १२० शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.प्रशिक्षणाचे उद्घाटन उपसभापती सुर्वे, सदस्य गौरव वेल्हाळ, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी बोलताना सुर्वे यांनी, जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ही खाजगी शाळांपेक्षा झपाट्याने वाढत आहेत. त्याला योग्य दिशा देण्यासाठी ही कार्यशाळा लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg