loader
Breaking News
Breaking News
Foto

पेडणेकर विद्यालय तळवडे येथे रंगणार विक्रमी बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सोबत बुद्धिबळ सामना

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे शरद वझे यांच्यासोबत मंगळवार दि. २९ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्रसिद्ध विक्रमी बुद्धिबळपटू, चॅलेंजर बुद्धीबळ अकॅडमी मुंबईचे अध्यक्ष शरद वझे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांबरोबर सायमलटेनियस बुद्धिबळ सामना होणार आहे. यापूर्वी शरद वझे यांनी गोरेगाव येथे सलग १० तासात २३६ विद्यार्थ्यांसोबत एकाच वेळी बुद्धिबळ खेळून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच धर्तीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी ११.०० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या विक्रमी सामन्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे तंत्र आणि रणनीती जवळून अनुभवता येणार आहे. बुद्धिबळ खेळामध्ये आवड असणार्‍या सर्वांनी हे सामने पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, तसेच तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई, स्थानिक संस्था व शाळा समिती सर्व पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg