loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी आतगांव परिसरात लाडक्या बाप्पाना भावपूर्ण निरोप

केळशी (मंगेश पाटील):- दापोली तालुक्यातील केळशी आतगाव, गुजरवाडा परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत गणपती बाप्पांची लेझीम नृत्य, ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. गेले बारा दिवस गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू होती. शुक्रवारी 25 रोजी दुपारनंतर बारा दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यास सुरुवात झाली. अतिशय शांततेत गणपती बाप्पांचे केळशी समुद्र किनारी व गौरीचे तळे या विसर्जन स्थळी आगमन होत होते. चार वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालली. गावातील नागरिक, स्त्रिया, लहान मुले बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला" या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पा निरोप देण्यात आला विसर्जन स्थळी गणपती बाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून समुद्र व तलाव यामध्ये विसर्जन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg