loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलचा दुर्वांकुर देवघरकर प्रथम

खेड (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा पाग व्यायामशाळा, चिपळूण येथे संपन्न झाली. यामध्ये रोटरी स्कूलच्या दुर्वांकुर संतोष देवघरकर याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव गौरवित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेकरिता तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या दुर्वांकुर देवघरकर याने प्रतिस्पर्धकांशी चुरशीची लढत देत प्रथम क्रमांक पटकावून आपले स्थान निश्चित केले आहे. दुर्वांकुर सलग तीन वर्ष राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे त्याचबरोबर रोटरी स्कूलचे प्रतिनिधित्व करत आहे. ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता त्याची निवड झाली आहे. या खेळाडूंच्या यशामुळे प्रशालेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

खेळाडूंना मल्लखांब प्रशिक्षक डाॅ. गौरव आंब्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन डाॅ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दुर्वांकुरचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg