loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब मालवणतर्फे निर्माल्य संकलन

मालवण (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ मालवण तर्फे गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे मालवण बंदर जेटी येथे गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. लायन्स क्लब सदस्यांनी गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलित करून ते मालवण नगरपालिकेकडे जमा करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशी, अकराव्या दिवशी तसेच अनंतचतुर्दशी दिवशी सायंकाळी लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी मालवण बंदर जेटी येथे उपस्थित राहत गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलित केले. यामध्ये फुले, हार व फुलपत्रीचा समावेश होता. हे निर्माल्य संकलन करून ते पुढील प्रक्रियेसाठी नगरपालिकेच्या निर्माल्य कलश मध्ये जमा करण्यात आले. गणेश भक्तांनीही या उपक्रमास प्रतिसाद देत निर्माल्य जमा केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी लायन्स क्लब मालवणच्या खजिनदार राधिका मोंडकर, सदस्य जयश्री हडकर, मुकेश बावकर, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, गणेश प्रभूलकर, मनाली दळवी आदी व इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg