loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळ जाहीर,कोकणच्या तोंडाला पाने पुसली

चौक, (अर्जुन कदम) राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले असून यात रायगड जिल्हा एक व एकूण कोकणात बारा तालुके जाहीर करण्यात आले आहेत.नेहमी प्रमाणे कोकणाला दुर्लक्षित केले असून कोकणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.राज्यात एकूण 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात16 तालुके जाहीर करण्यात आले आहेत,ठाणे व पालघर जिल्ह्यात एकही तालुका नसून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हा एकमेव तालुका जाहीर करण्यात आला आहे.कोकणावर नेहमीच अन्याय झाला आहे.दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत कोणती आहे?असा संतप्त सवाल कोकणातील शेतकरी विचारतो आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वादळवारा,जोरदार पाऊस याने घरांचे नुकसान झालेअसून मागील वर्षी देखील नुकसान झाले आहे,मात्र पंचनामे केले,अद्याप मदतीचा हात पुढे केला नाही.याही वर्षी शेतीचे नुकसान झाले आहे,मग कोकणावर अन्याय का?येथील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे का?असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg