loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात, जोरदार लढत होणार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून कोण मागे घेणार की सहाच्या सहा उमेदवार रिंगणात कायम रहाणार याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. दिनांक २ डिसेंबर रोजी होणा-या लांजा नगरपंचायतच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ७ जणांनी ऊमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १ अर्ज छाणनीमध्ये फेटाळण्यात आला. आता सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सहा उमेदवार कायम रहाणार की, माघार घेणार याकडे लक्ष वेधले आहे. आज तरी महायुतीच्या उमेदवार सावली सुनिल कुरुप, महाविकास आघाडीच्या पुर्वा मुळे आणी भाजपा पक्षाच्या अपक्ष प्रियांका संजय यादव यांच्यातच तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लांजा-राजापूर चे आमदार किरण सामंत यांच्यासाठी लांजा नगरपंचायत निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. आमदार सामंत याकडे बारकाईने लक्ष ठेवून असुन लांजा नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याचा निर्धार आमदार किरण सांमत यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg