loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळचे विशेष मार्गदर्शन शिबीर

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळ खेळाचे विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीर घेण्यात येईल. पुढील कालावधीत होणा-या विदयार्थ्यांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबीरात ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम, स्पर्धेचे नियम, इत्यादी विषय शिकवण्यात येतील. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी सदर शिबीरात जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक विदयार्थ्यांनी आपली नावे कौस्तुभ पेडणेकर, मो.क्र.८००७३८२७८३ यांच्याकडे दयायची आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg