रत्नागिरी, (संतोष कांबळे) - “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या योजना व आवश्यक शासकीय प्रमाणपत्रांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” या विशेष मोहिमेचे आयोजन दि. 27, 28 व 29 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले. रत्नागिरीमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत 28 सप्टेंबर 2026 रोजी कुवारबाव येथे भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ.उदय सामंत हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमास महसुल व गृह (शहरे) ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषदेचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूर लांज्याचे आमदार किरण सामंत, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव तथा रत्नागिरीचे पालक सचिव आप्पासो धुळाज, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही मनोज रानडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रम कुवारबाव ग्रामपंचायत सभागृह, रत्नागिरी येथे सोमवार दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.00 ते सायं. 4.00 या वेळेत होणार आहे.
यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचा लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज नोंदणी करण्याची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी 10.00 ते सायं.5.00 वाजेपर्यंत राहणार आहे. तरी जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, तसेच उपलब्ध सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अभियानस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदय गायकवाड यांनी केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.