मालवण, (प्रतिनिधी) : गणपती विसर्जनानंतर समुद्राच्या लाटांसोबत मोठ्या प्रमाणात निर्माल्य, प्लॅस्टिक व अन्य कचरा दांडी समुद्रकिनारी वाहून आल्याने किनारा अस्वच्छ झाला होता. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांसह पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने पुढाकार घेत मालवण नगरपालिकेच्या सहकार्याने दांडेश्वर मंदिर परिसर ते दांडी आवार या संपूर्ण किनारपट्टीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेमुळे दांडी किनार्याने पुन्हा स्वच्छ व नयनरम्य रूप धारण केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात समुद्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींसोबतचे निर्माल्य, पूजासाहित्य, कपडे, प्लॅस्टिक तसेच अन्य टाकाऊ वस्तू समुद्राच्या लाटांबरोबर मोठ्या प्रमाणात दांडी किनार्यावर येऊन साचल्या होत्या. सकाळच्या सत्रात मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांमध्येही हे निर्माल्य व कचरा अडकत असल्याने मासेमारीच्या कामात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, पर्यटन हंगाम सुरू असल्याने दांडी किनार्यावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, किनार्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचर्यामुळे या निसर्गरम्य समुद्रकिनार्याचे सौंदर्य झाकोळले होते. पर्यटकांना स्वच्छ व सुंदर किनारा उपलब्ध करून देण्याबरोबरच मच्छिमारांच्या समस्या दूर करण्यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांनी दांडेश्वर मंदिर परिसर ते दांडी आवार या संपूर्ण किनार्याची सखोल स्वच्छता केली. किनार्यावर साचलेले निर्माल्य, प्लॅस्टिक, कपडे तसेच अन्य टाकाऊ साहित्य गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. अल्पावधीतच संपूर्ण किनारा स्वच्छ झाल्याने स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले.यावेळी अन्वेषा आचरेकर म्हणाल्या, दांडी किनारा हा मालवणच्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असून स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचेही महत्त्वाचे केंद्र आहे. विसर्जनानंतर किनार्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने मच्छिमारांना मासेमारी करताना अडचणी येत होत्या. तसेच पर्यटकांच्या दृष्टीनेही ही बाब योग्य नव्हती. त्यामुळे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम तातडीने राबविण्यात आली. पर्यटनवृद्धीसोबतच समुद्रकिनार्याचे पर्यावरण आणि स्वच्छता जपणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
२७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. मालवण हे कोकणातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने येथील समुद्रकिनार्यांचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण जपण्याला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करताना तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य व पूजासाहित्य समुद्रकिनारी न टाकता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहनही या मोहिमेतून करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेबद्दल स्थानिक मच्छिमार, नागरिक आणि पर्यटकांनी महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर तसेच मालवण नगरपालिका स्वच्छता कर्मचार्यांचे आभार मानले. वेळेवर राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे दांडी किनारा पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकांसाठी आकर्षक झाला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.