loader
Breaking News
Breaking News
Foto

बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात लांजा तालुक्यातील 2043 बाप्पाना भावपूर्ण निरोप.

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष करीत अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात लाडक्या बापाला साश्रू नयनांनी निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले होते. बारा दिवस भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले लांजा तालुक्यातील गावा गावातील आपल्या या लाडक्या बाप्पाला जड अंत करणाने निरोप देण्यात आला. तालुक्यात घरगुती 2035 आणी 8 सार्वजनिक असे 2043 गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवात गावा गावातील मंगलमय वातावरणात निर्माण झाले होते. गणपतीचे बारा दिवसांतील वेळ कसा निघून गेला, हे ग्रामस्थांना समजलेच नाही विधीवत उत्तर पुजा आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून विसर्जनस्थळी नेण्यासाठी बाप्पा घराबाहेर पडताच आबाल वृध्दापर्यंत सर्वानी एकच जयघोष केला. गुलालाची उधळण करत आणि 'मोरया च्या सुरांत विसर्जनस्थळांकडे मिरवणुकीने मार्गस्थ झाले. अखेरच्या दिवशी बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूकीमुळे पारंपरिक वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि भजने यामुळे विसर्जन मार्ग दुमदुमून गेला होता. लांजा शहरातील आडाचा प-या, ओझर, बेनी नदी या मुख्य विसर्जनस्थळी बाप्पाची महाआरती करण्यात आली आणि अत्यंत भावूक वातावरणात लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालवृध्दासह महीला मोठ्या संख्येत उपस्थित होते. यंदा वरूण राजाने कृपा केल्याने गणेशोत्सवाच्या उत्सवात अधिकच रंगत आली. बाप्पाचे आगमन आणि विसर्जन कालावधित पाऊस पडला नसल्यामुळे या उत्सवात गावातील आनंद द्विगुणीत झाला. विसर्जन शांततेत सुकर व्हावे यासाठी विसर्जन स्थळांवर, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अत्यंत शिस्तबध्द आणि तितक्याच भावूक वातावरणात सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg