loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत डी.जे. सामंत इंग्लिश मिडीयम प्रशालेच्या तिर्था यादवचे सुयश, विभाग स्तरावर निवड

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - श्री.साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी पाली संचलित डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम प्रशालेतील जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत सात विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा राजापूर येथे पार पडली. या स्पर्धेतून प्रशालेने दोन पदकांची कमाई केली तर एका विद्यार्थ्यांनीची विभाग स्तरावर निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील तिर्था गणेश यादव या विद्यार्थिनीने सुवर्ण पदक आणि १४ वर्षे वयोगटातील गौरी प्रवीण रत्नपारखी या विद्यार्थिनीने कांस्य पदक संपादन केले. यांतील तिर्था गणेश यादव हिची कोल्हापुर येथे २ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार्‍या विभाग स्तरावरील स्पर्धेत निवड झाली आहे.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेसाठी तायक्वांडो प्रशिक्षक तेजस पावसकर, क्रीडा शिक्षक अजय करळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. या उत्तम कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र उर्फ अण्णा सामंत तसेच स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक कामत, संजय तेंडुलकर, समिक्षा कामत, सावंत, देसाई, नंदकिशोर कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg