loader
Breaking News
Breaking News
Foto

ढोक्रवलीच्या अंगणवाडी सेविकांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) - चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली गावातील अंगणवाडी सेविका शितल राणीम व पूर्वी गावकर यांच्या समाजोपयोगी व सेवाभावी कार्याची दखल घेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील बालकांच्या संगोपनासह त्यांच्या आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी सेविका सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते व जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, ग्रामपंचायत ढोक्रवलीच्या माजी सरपंच सलोनी गावकर, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा पूजा मांडवकर यांच्यासह बाळ घवाळे, दिनेश घवाळे, महेंद्र वामणे, योगेश राणीम, अशोक मोहिते, सोमा राणीम, विजय जोशी, कृष्णा मोहिते, प्रशांत राणीम, दीपक मोहिते, दक्षता मोहिते, किरण कुंडूगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील सेवाभावी व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg