दापोली (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या उत्साहात दापोलीतील दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली (रजि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ बाप्पा’ गणेशोत्सव विशेष सेल्फी कॉन्टेस्ट २०२६’ या अभिनव स्पर्धेला दापोली तालुक्यातून उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला. बाप्पांसोबतच्या सुंदर आठवणी छायाचित्राच्या माध्यमातून जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. घरगुती गणेशोत्सवातील बाप्पांसोबतचे आपले सुंदर क्षण स्पर्धकांनी सेल्फीच्या माध्यमातून टिपून संस्थेकडे पाठविले. विशेष म्हणजे सुमारे दहा वर्षांच्या मुलांपासून ते सत्तर वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने स्पर्धेला सर्व वयोगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गणेशोत्सवाच्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेणारा आणि बाप्पांसोबतची आठवण कायमस्वरूपी जतन करणारा हा उपक्रम असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक झाले. स्पर्धेतील विजेत्यांची निवड दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. कैलास गांधी, कलाशिक्षक पारदुले आणि फोटोग्राफर लिंगावळे यांनी परीक्षण करून केली. स्पर्धेत आंबवली खुर्द, आसूद येथील प्रमोद शिवराम बेनेरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वडाचा कोंड, दापोली-दाभोळ रोड येथील अमित वसंत रेमजे यांनी द्वितीय, तर श्रीजी गुलमोहोर, उदयनगर, दापोली येथील स्वराज्य सत्यवान दळवी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन परीक्षकांच्या आग्रहास्तव जाहीर करण्यात आलेल्या तीन पारितोषिकांव्यतिरिक्त भूषण विठ्ठल इस्वलकर, वणंद फाटा, गिम्हवणे, दापोली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १,५००, १,००० आणि ५०० अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती. मात्र स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि छायाचित्रांची गुणवत्ता पाहता परीक्षकांच्या सूचनेनुसार उत्तेजनार्थ पारितोषिकाची भर घालण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दशानेमा गुजर युवक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, सचिव मयुरेश शेठ, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, खजिनदार स्वप्नील मेहता, प्रकल्प संचालक साहिल कडके, प्रा. तेजस मेहता, सी.ए. ऋषिकेश शेठ, स्वामी बुटाला, सार्थक बुटाला तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व वयोगटांना जोडणारा आणि आनंदासोबत आठवणी जपणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल दशानेमा गुजर युवक संस्थेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.