loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड (प्रतिनिधी) - रुग्णसेवेत समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांच्या योगदानाचा गौरव करत ‘सेवा संकल्प’ अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर रुग्णालय, रोग निदान व संशोधन केंद्रात रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य सेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेताना आरोग्य सेविका बजावत असलेली जबाबदारी आणि त्यांचे सेवाभावी योगदान याबद्दल यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. ‘सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आरोग्य क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाग, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, दीपक मोहिते तसेच वालावलकर रुग्णालयातील सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील, ऋषिकेश शिवगण, दीपा गवस, सुरज पवार, अमित वैद्य, संतोष जाधव, स्वप्निल ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg