मंडणगड (प्रतिनिधी) - क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्यपूर्ण पंचगिरीच्या माध्यमातून कबड्डी खेळाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी असोसिएशनचे पंच तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी वतीने जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते वतीने सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय कबड्डी असोसिएशन पंच सचिन सकपाळ, सुरज महाडीक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच विजय जाधव, प्रज्योत गांधी हे पंच म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या पंचांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कबड्डी तालुका समन्वयक गौतम माने, वसंत पाटील, साई पवार, देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक अमित रसाळ, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर म्हणाले की, कबड्डी हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला खेळ असून, खेळाडूंच्या कौशल्याला योग्य दिशा देण्याबरोबरच सामन्यात शिस्त, नियम आणि खेळभावना कायम ठेवण्यात पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राष्ट्रीय व राज्यस्तरावर पंच म्हणून कार्यरत राहून क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम वाढण्यासोबतच पंचांच्या कार्याची आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. ‘सेवा संकल्प’ अभियानातून सामाजिक कार्यासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.