loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशेतीला उन्हाचा जबर तडाखा

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशेतीला उन्हाचा शनिवारी जबरदस्त तडाखा बसला. सर्वसामान्य लोकांतून जबर ऊन पडल्याचे जाणवले आहे. भात आणि नाचणी शेतीच्या मुळाशी असलेले पाणी अंशतः सुकून जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आतापासूनच कातळशेतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचे तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. अनेक ठिकाणी याची तीव्रता त्यापेक्षा अधिक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर अखेर ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागतील, त्यामुळे दुष्काळजन्य स्थिती भारतात अनेक ठिकाणी निर्माण होईल, असे म्हटले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक तालुक्यांमध्ये यंदा भयावह दुष्काळ स्थिती आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीही प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या भेटी घेवून याचा आढावा घेतला. राज्य शासन याबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. कृषी विभागाला त्या संदर्भात आदेश जारी केले आहेत. जिल्हा प्रशासन अधिक सक्षमपणे याबाबत कारवाईला लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळजन्य स्थिती निर्माण होवू शकते का? याचा आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी अशी स्थिती निर्माण होईल, त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आज शनिवारपासूनच रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता जाणवत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg