loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका काँग्रेसची बैठक संपन्न; झिनत नाडकर यांची खाडीपट्टा महिला अध्यक्षपदी तर इब्राहिम परकार यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड

खेड : खेड तालुका काँग्रेसची बैठक शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यालयात अध्यक्ष अजीमभाई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस फैसल देसाई, मुराद लाडघरकर, महमंद काझी, तौफिक पोत्रिक, इब्राहिम परकार, सीमा शिंदे (जाधव), नाझिमा तांबे, कौसर मुजावर, झिनत नाडकर, सुवर्णा गमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. झिनत नाडकर यांची खाडीपट्टा महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर इब्राहिम परकार यांना तालुका उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. बैठकीच्या शेवटी जनरल सेक्रेटरी यांनी सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg