loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यात ४ हजार ३५० घरगुती गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : अनंत चतुर्दशीच्या पावन दिवशी गुहागर तालुक्यात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. तालुक्यातील तब्बल ४ हजार ३५० घरगुती गणपतींचे तसेच एका सार्वजनिक गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात आणि शांततेत पार पडले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून गणरायाचे विसर्जन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यात विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक पातळीवर आवश्यक नियोजन करण्यात आले होते. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांततेत गणेश विसर्जन केले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा उत्साह, भक्तिभाव आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg