loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेकडून डॉ. ऋषीता पवार हिचा सत्कार

शृंगारतली : जाहिद मुजावर : गुहागर तालुक्यातील चिखळी येथील ऋषीता राजेंद्र पवार हिने एमबीबीएस MBBS परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर पदवी संपादन केल्याबद्दल गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने शृंगारतळी येथील विष्णुपंत पवार मेमोरियल हॉस्पिटल येथे तिचा विशेष सत्कार करण्यात आला.​वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवून डॉक्टर झालेल्या ऋषीताच्या या यशाची दखल घेत संस्थेच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान ऋषीताचे वडील डॉ.राजेंद्र पवार,तिची आई आणि बहीण उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​यावेळी गुहागर तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष श्री.शाबीर भाई साल्हे, उपाध्यक्ष लतीफ लालू, सचिव इक्बाल पंछी आणि संस्थेचे इतर सर्व सभासद उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ.ऋषीता हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg