सावंतवाडी : आपल्या गुणवत्तेची आणि सर्जनशीलतेची छाप कोल्हापूरच्या भूमीत उमटवत सावंतवाडीच्या साईश गावडे यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोल्हापूर येथील ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत साईशने यावर्षी तृतीय क्रमांक पटकावत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण यशामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. साईश गावडे हा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.
२०२४ मध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर त्याने ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला आणि थेट प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कलागुणांची दमदार झलक दाखवली. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने या स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर २०२६ मध्ये पुन्हा तृतीय क्रमांक पटकावत आपल्या यशाची मालिका कायम ठेवली. सलग तीन वर्षे या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावण्याची कामगिरी म्हणजे साईशच्या सर्जनशीलतेला, मेहनतीला आणि सातत्याला मिळालेली दादच म्हणावी लागेल. २०२४ – प्रथम क्रमांक, २०२५ – तृतीय क्रमांक, २०२६ – तृतीय क्रमांक.. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ‘सावंतवाडीच्या मुलाने कोल्हापुरात आपल्या प्रतिभेचा डंका वाजवला’ अशी कौतुकाची भावना व्यक्त होत असून, साईशवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, साईश गावडे सध्या ऑल इंडिया फिजिओथेरपी कॉन्फरन्ससाठी दिल्ली येथे गेला आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील नामवंत फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करणार आहेत. फिजिओथेरपीच्या शिक्षणासोबतच सर्जनशील क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साईशच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे. शिक्षण, क्रीडा-सर्जनशीलता आणि व्यावसायिक क्षेत्रातील वाटचाल अशी बहुआयामी कामगिरी करणाऱ्या साईश गावडे याचे सावंतवाडीकरांकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.