loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर, मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास

पनवेल - शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित झाल्याने मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून या शाळेचा शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला आहे. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये सामग्री व मजकूर निर्मिती या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील निवडक १०० शाळांच्या प्रेरणादायी यशोगाथांना राष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळाले आहे. शालेय शिक्षण अधिकार्‍यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या या यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था एनआयईपीए, राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (एनसीएसएल) नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उल्लेखनीय उपक्रमामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळेच्या पनवेल तालुक्यातील सांगुर्ली या शाळेची यशोगाथा प्रकाशित झाली आहे. ही यशोगाथा महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व मुख्याध्यापिका मानसी मिलिंद भोसले यांनी लिहिली आहे. हुशार व प्रतिभावान विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देणार्‍या शाळेची यशोगाथा या शीर्षकाने ती राष्ट्रीय पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. अधिकृत नोंदीनुसार या यशोगाथेत शाळा विकास, शाळेचे परिवर्तन, आदर्श शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी प्रवेशवाढ, पालक सहभाग, समुदायाचा सहभाग आणि इंग्रजी माध्यमातील शैक्षणिक संधी यांसारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

ग्रामीण भागातील शाळेच्या शैक्षणिक वाटचालीची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताविकासासाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही रायगड जिल्ह्यासाठी तसेच शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. शालेय नेतृत्व, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामूहिक प्रयत्नांतून शाळेचा विकास साधता येतो, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानसी मिलिंद भोसले तसेच सर्व सहभागी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षीय अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg