loader
Breaking News
Breaking News
Foto

स्पेस पार्कबाबतच्या अफवांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण, स्थानिकांच्या विश्वासाशिवाय प्रकल्प नाही

रत्नागिरी (जमीर खलफे) : महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पेस पार्क आणि अणूऊर्जा प्रकल्पांसंदर्भात निर्माण झालेल्या विविध चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. माचाळ येथे स्पेस पार्क होणार असल्याच्या बातम्यांवर त्यांनी स्पष्टीकरण देत या संपूर्ण विषयावर प्रकाश टाकला. पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीतील एका बांधकामासंदर्भात २,००० वर्षे टिकणार्‍या इमारतीबाबत मी बोललो होतो. परंतु, माचाळ येथे ’स्पेस पार्क’ होणार असल्याचे वक्तव्य माझ्या तोंडी चुकीच्या पद्धतीने किंवा गैरसमजातून टाकले गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान ५ सॅटेलाईट अवकाशात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे उद्दिष्ट पुढील १८ महिने ते २ वर्षांत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सॅटेलाईटची यंत्रणा थंड हवेच्या ठिकाणी ठेवणे आवश्यक असल्याने कोकणातील माचाळ किंवा एमएमआर क्षेत्रातील माथेरानसारख्या ठिकाणांचा केवळ एक उदाहरण म्हणून उल्लेख करण्यात आला होता. महाबळेश्वर येथे जागा उपलब्ध नसल्यामुळे या इतर ठिकाणांचा विचार होऊ शकतो, एवढाच तो मुद्दा होता. त्यामुळे माचाळमध्ये थेट ’स्पेस पार्क’ होणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा वास्तवाशी संबंध नाही.

टाईम्स स्पेशल

याचसोबत, दापोली किंवा राजापूर परिसरातील अणूऊर्जा प्रकल्पांच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, अशा कोणत्याही प्रकल्पाचे अधिकृत नोटिफिकेशन (अधिसूचना) निघालेले नाही. केवळ सामंजस्य करार (एमओयु) झाला म्हणजे प्रकल्प निश्चित झाला, असे होत नाही. उद्योगमंत्री म्हणून माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे; स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पबाधितांना पूर्ण विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग कोणतेही पुढील पाऊल उचलणार नाही, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg