देवगड (प्रतिनिधी) - “गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!” अशा जयघोषात अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवगड तालुक्यातील विविध गावांमध्ये लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सकाळपासूनच देवगड तालुक्यातील विविध ठिकाणी गणेश विसर्जनाची लगबग सुरू होती. घराघरातील गणरायाला आरती करून, नैवेद्य दाखवून भक्तांनी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक वाद्यांच्या साथीने विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
दरम्यान, देवगड तालुक्यातील देवगड, कुणकेश्वर, विजयदुर्ग, मिठबाव, तांबळडेग, पुरळ, आदी समुद्री किनाऱ्यावर व खाडी भागात लाडक्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. हरिनामाच्या गजरात गणेशमूर्तीची मिरवणूक काढून कालावडीच्या खाडीपात्रात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी खाडीकिनारी गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांच्या डोळ्यांत आनंदासोबतच विरहाचे अश्रूही तरळले होते.
11 दिवस भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये भक्तिभावाने विराजमान झालेल्या गणरायाला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनाची आस निर्माण झाली. भक्ती, परंपरा आणि भावनेचा सुंदर संगम साधत यंदाचा गणेशोत्सवही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.