loader
Breaking News
Breaking News
Foto

कशेडी ओझरवाडी येथे एसटी शेडअभावी प्रवाशांचे हाल; बोगद्याबाहेर पथदिवे बंद, अपघाताचा धोका

कशेडी, ओझरवाडी (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट आणि नव्याने सुरू झालेला कशेडी बोगदा प्रवाशांसाठी वरदान ठरला असला, तरी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कशेडी ओझरवाडी येथील प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. येथे अद्यापही हक्काची एसटी बस शेड उभी न झाल्याने मुंबईला जाणार्‍या एकही एसटी गाडी थांबत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे बोगद्याच्या बाहेरील बाजूचे पथदिवे पूर्णपणे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते आणि भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ओझरवाडी आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार आणि मुंबईला जाणारे चाकरमानी दररोज या मार्गावरून प्रवास करतात. मात्र कशेडी ओझरवाडी येथे अधिकृत एसटी बस शेड (निवारा) नसल्याचे कारण सांगून कोणत्याही आगाराची मुंबईकडे जाणारी एसटी बस येथे थांबत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिणामी लहान मुले, महिला, वृद्ध आणि रुग्णांना भर उन्हात आणि पावसात महामार्गाच्या कडेला ताटकळत उभे राहावे लागते. अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा थांब्यासाठी खेड किंवा पोलादपूरपर्यंत जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैशाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना कशेडी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश मनोहर चव्हाण म्हणाले, आम्हाला मुंबई गाठण्यासाठी गाडी थांबवण्यासाठी अक्षरशः हातवारे करावे लागतात, तरीही गाड्या थांबत नाहीत. एसटी महामंडळ आणि महामार्ग प्राधिकरणाने येथे तातडीने सुसज्ज बस शेड उभारून मुंबईच्या गाड्यांना अधिकृत थांबा द्यावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg