loader
Breaking News
Breaking News
Foto

भोसले फार्मसी कॉलेजतर्फे सावंतवाडीत जनजागृती रॅली : औषधांच्या पलीकडील आरोग्याची दिशा; फार्मासिस्टच्या भूमिकेचा प्रभावी संदेश

सावंतवाडी - जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. औषधांच्या सुरक्षित व योग्य वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच आरोग्यव्यवस्थेतील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी आणि योगदान याबाबतचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. जगन्नाथराव भोसले उद्यान येथून रॅलीला सुरुवात झाली. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई यांनी श्रीफळ वाढवून व फीत कापून रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी प्राचार्य डॉ. विजय जगताप, वरिष्ठ अधिव्याख्याता सत्यजित साठे, डॉ. विनोद मुळे, डॉ. प्रशांत माळी, डॉ. तुषार रुकारी यांच्यासह प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही रॅली रामेश्वर प्लाझा, नगरपालिका, श्रीराम वाचन मंदिर, राजवाडा, उपजिल्हा रुग्णालय अशाप्रकारे मार्गक्रमण करत पुन्हा भोसले उद्यान येथे पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांनी औषधविषयक जनजागृती करणारे तसेच फार्मासिस्टच्या आरोग्यविषयक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारे आकर्षक स्लोगन्स पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केले. या विविध संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण रॅलीदरम्यान उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी पथनाट्य देखील सादर केले. औषधे व गोळ्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, औषधांचा वापर जबाबदारीने का करावा आणि फार्मासिस्टचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे याबाबतचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. रॅलीला सावंतवाडी नगरपरिषद तसेच पोलीस विभागाचे उत्तम सहकार्य मिळाले. दरम्यान, जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त उद्या कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन तसेच फार्मासिस्ट ऑफ द ईयर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg