loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्य संकलन, निर्माल्यातून होणार कंपोस्ट खतनिर्मिती

मालवण (प्रतिनिधी) - पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश कृतीतून देणाऱ्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा जि. रायगड यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवात गोळा झालेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरणपूरक कंपोस्ट खत निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या, अकराव्या तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ श्रीबैठकांतील २४० श्रीसदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे ९ टन ७८० किलो निर्माल्य संकलित करून खत निर्मितीसाठी व्यवस्थापन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर नद्या, तलाव व समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य पाण्याच्या स्रोतांमध्ये विसर्जित केल्याने जलप्रदूषण होते व दुर्गंधी सुटते. यावर पर्यावरणपूरक तोडगा म्हणून प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांच्या व स्थानिक प्रशासनाच्या सहभागातून संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून हे निर्माल्य गोळा करण्यात आले. गोळा केलेल्या निर्माल्यातील प्लास्टिक, हार-धागे वेगळे करून केवळ नैसर्गिक फुले-पानांचा वापर खत निर्मितीसाठी केला गेला आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर केले जाईल. यातून निर्मिती झालेले खत हे प्रतिष्ठानमार्फत लागवड केलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांसाठी वापरले जाते. संवर्धन केलेले वृक्ष उत्तम प्रकारे वाढ झाल्यानंतर त्याचे शासनाकडे हस्तांतरण केले जाते.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्रभूषण डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. निर्माल्यापासून खतनिर्मिती हादेखील याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग आहे. या प्रकारच्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावरील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी झाला असून, समुद्र, नद्या, तलाव यांसारख्या जलस्रोतांचे जलप्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. याप्रसंगी मालवण जेटी-बंदर येथे नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक शेलार यांनी भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg