loader
Breaking News
Breaking News
Foto

योगा स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी !

खेड (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी मार्फत दिनांक २३नोव्हेंबर २०२६ ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात आलेल्या डेरवण (स्पोर्ट कॉम्प्लेक्स ) येथील स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड येथील विद्यार्थ्यांनी योगासन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी विविध योगा, योगकौशल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून आपल्या कौशल्याची छाप पाडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये श्लोक दळवी, श्री दळवी (आर्टिस्टिक पेयर )रौप्यपदक, (रिदमिक पेयर) रौप्यपदक तसेच स्पंदन धामणे (आर्टिस्टिक सिंगल) कास्य पदक, शाश्वत धुमाळ आणि स्पंदन धामणे (आर्टिस्टिक पेयर) रौप्यपदक, (रिदमिक पेयर ) कास्य पदक या पदकांची कमाई केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी आवड निर्माण होण्यासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि शिस्त या गुणांचा विकास होण्यास मदत झाली.

टाईम्स स्पेशल

सदर विद्यार्थ्यांना योगा शिक्षक श्री.गौरव आंब्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ.उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg