रत्नागिरी : जलसंवर्धनाच्या माध्यमातून भूजलपातळी वाढविणे, शेती तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे आणि पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा जलसंवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या १५ दिवसांत राज्यातील विविध गावांमध्ये तब्बल ४ हजार ७१ वनराई बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. ८ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी गावागावांत एकत्र येत ओढे, नाले, नदीपात्रे तसेच विविध जलप्रवाहांवर मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे उभारले. या अभियानाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४३८ वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय कामगिरी खेड – १२६ बंधारे, गुहागर – ११२ बंधारे, चिपळूण – ६४ बंधारे, दापोली – ३५ बंधारे,, राजापूर – ३१ बंधारे, संगमेश्वर – २५ बंधारे, रत्नागिरी – २० बंधारे, लांजा – १६ बंधारे, मंडणगड – ९ बंधारे..एकूण – ४३८ वनराई बंधारे. जलसंवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आपल्या अनुयायांना ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनुयायांनी गावागावांत सामूहिक सहभागातून जलसंवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे.
यावर्षी अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, जलसाठे निर्माण करणे आणि भूजलपातळी वाढविणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे जलप्रवाहातील पाणी काही काळ अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याच्या गरजा भागविण्यास याचा फायदा होणार आहे. जलप्रवाहांवर वनराई बंधारे उभारणे हे कष्टाचे आणि सामूहिक सहभागाची आवश्यकता असलेले काम आहे. मात्र, जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येत समाजहिताच्या या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. केवळ १५ दिवसांत ४ हजार ७१ वनराई बंधारे उभारण्याची ही कामगिरी जलसंवर्धनासाठी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या प्रभावी चळवळीचे उदाहरण ठरली आहे.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.