loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रपती भवनात दोडामार्गच्या दोन कलावंतांचा गौरव! देविदास कदम, गिरीश जाधव यांच्या कलात्मक योगदानाची दखल; गोवन अझुलेजोस कलेला राष्ट्रीय सन्मान

दोडामार्ग, (प्रतिनिधी)- गोव्याच्या पारंपरिक अझुलेजोस कलेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी योगदान देणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील दोन कलावंतांचा राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. मोरगाव येथील देविदास कदम आणि कुडासे येथील गिरीश जाधव हे गोव्यातील ‘तुरी अझुलेजोस अँड पोटरी’ या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. संस्थेच्या कलात्मक योगदानाची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना विशेष सन्मान प्राप्त झाला. या गौरवामुळे दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अझुलेजोस ही सिरेमिक टाइल्सवर विविध कलात्मक चित्रे साकारण्याची वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कला आहे. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या कलाप्रकाराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ‘तुरी अझुलेजोस अँड पोटरी ही संस्था कार्यरत आहे. हाताने रंगविलेल्या टाइल्सवर विविध आकर्षक कलाकृती साकारत ही संस्था पारंपरिक कलेला नवी ओळख देण्याचे काम करीत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी आयोजित विशेष ‘ॲट होम’ समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेच्या संचामध्ये या संस्थेला गोवन अझुलेजोस कलाकृती तयार करण्याचा मान मिळाला. संस्थेच्या कलात्मक कार्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रपती भवनातील या समारंभात हस्तनिर्मित अझुलेजोस कलाकृतींमागील प्रक्रिया कलावंतांनी राष्ट्रपतींसमोर समजावून सांगितली. पारंपरिक कलेतील कौशल्य, सर्जनशीलता आणि सातत्यपूर्ण मेहनतीची दखल या सन्मानातून घेण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून कलावंतांना मिळणारे प्रशिक्षण, त्यांची कलात्मक अभिव्यक्ती आणि पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांना या गौरवामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg