सावंतवाडी, (प्रतिनिधी) - गेल्या वर्षभरापासून आपल्या मूळ कळपापासून ताटातूट झालेला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारच्या गोवा राज्यात मुक्त संचार करणारा 'ओंकार' हत्ती अखेर आपल्या कुटुंबात परतला आहे. बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील घनदाट जंगलात ओंकारची त्याच्या मूळ कळपाशी भेट झाली. या दुर्मिळ मनोमिलनाला वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांनी अधिकृत दुजोरा दिला असून, या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जन्म झालेला ओंकार हत्ती अधूनमधून कुटुंबापासून वेगळा होत असे. मात्र, गेल्या वर्षभरापासून तो आपल्या कळपाला सोडून दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले तालुक्यातील विविध गावांसह गोवा राज्यातील भागात सातत्याने भटकंती करत होता. ओंकारच्या या मुक्त संचारामुळे महाराष्ट्र आणि गोवा वन विभागाची पथके त्याच्या हालचालींवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवून होती. त्याच्या सुरक्षेसाठी खास टीमही तैनात करण्यात आली होती.
भटकंतीदरम्यान ओंकारला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असे. अनेक ठिकाणी तो थेट मानवी वस्तीत आणि घरां अगदी जवळ पोहोचल्याचे पाहायला मिळाले. ओंकारचे फोटो आणि व्हिडिओ काढून रिल्स बनवण्याची तरुणाईत मोठी क्रेझ निर्माण झाली होती. ओंकारला गणपतीचे रूप मानले जात असल्याने काही भागांत तर त्याच्या पायाच्या ठशांची पूजाही केली जात होती. एकिकडे ओंकारची लोकप्रियता वाढत असताना, दुसरीकडे त्याच्या वावरामुळे वाहने, शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे ओंकारच्या भटकंतीबाबत स्थानिकांमध्ये तीव्र मतप्रवाह निर्माण झाले होते. वन विभाग मुद्दामहून हत्तीला गावोगावी फिरवून शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप करत काही ग्रामस्थांनी संतापही व्यक्त केला होता.
अखेर बुधवारी कोलझरच्या जंगलात ओंकार आणि त्याच्या कळपाची गाठ पडली. उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. कळपात परतल्यामुळे आता ओंकारचा नैसर्गिक अधिवासातील वावर अधिक सुरक्षित आणि स्थिर होईल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, ओंकार आता आपल्या कुटुंबात कायमचा रमतो की पुन्हा एकदा वेगळी वाट स्वीकारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.