चिपळूण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, तसेच शेतीमालाची वाहतूक अधिक सोयीस्कर व्हावी, या उद्देशाने वालोपे येथे पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते या कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, अनेक ठिकाणी रस्त्यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासह शेतीमालाची वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात या समस्या अधिक गंभीर बनतात. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शेखर निकम सातत्याने प्रयत्नशील आहेत.
या कामांमुळे वालोपे परिसरातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगला मार्ग उपलब्ध होणार असून, शेतीची अवजारे, खते, बियाणे तसेच उत्पादित शेतीमालाची ने-आण करणे अधिक सोयीचे होणार आहे. परिणामी शेतीच्या कामांना गती मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थाही अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते ही मूलभूत आणि महत्त्वाची पायाभूत सुविधा असल्याचे सांगितले. गावागावांतील रस्त्यांचे प्रश्न सोडविणे, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे आणि ग्रामीण भागात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या भूमिपूजन सोहळ्याला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, उपसभापती संदेश आयरे, प्रतीक सुर्वे, संदेश गोरीवाले, दिलीप मयेकर, रवी तांबिटकर, पिंट्या मयेकर, भाई आयरे, रवी आयरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाल्याने वालोपे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील शेतीला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरणार असून, या विकासकामाबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार व्यक्त केले.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.