कणकवली २७ नोव्हेंबर (प्रतिनिधी)- घराच्या टेरेसवरून पडून हळवल - मधलीवाडी येथील सुरज अविनाश राणे (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुरज कुणाला तरी कॉल करण्यासाठी टेरेसवर गेला होता मात्र तो नेमका कसा पडला हे समजू शकले नाही. सुरज उत्कृष्ट चित्रकार होता. तो हुबेहूब रांगोळ्या रेखाटायचा. सध्या तो बोर्डवे पोस्ट खात्यात कार्यरत होता. तत्पूर्वी तो हळवल ग्रामपंचायतीचा सदस्य देखील होता.
सुरज हा आई-वडील व भाऊ प्रथमेश यांच्या समवेत हळवल मधलीवाडी येथील घरात राहतो. त्याचे आई-वडील काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. घरात सुरज व भाऊ प्रथमेश असे दोघेच होते. तर शेजारीच राहणारे त्यांचे चुलत भाऊ सचिन सूर्यकांत राणे (४६) हे गुरुवारी रात्री सुरज यांच्या घरी झोपायला आले होते. जेवणानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सचिन आणि प्रथमेश झोपी गेले. तर सुरज कुणाला तरी कॉल करण्यासाठी टेरेसवर गेला. दरम्यान सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सचिन याने पाहिले असता सुरज घरात दिसून आला नाही. सचिन यांनी सुरज याला फोन केला असता सुरज याचा मोबाईल घराबाहेर वाजत असल्याचे लक्षात आले. सचिन यांनी तेथे जाऊन पाहिले असता सुरज गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती.
घटनेची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरज याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता सुरज याचा मृत्यू झाला होता.त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका काकी असा परिवार आहे. हळवल गावचे माजी तंटामुक्त समिती सदस्य अविनाश राणे यांचा तो मुलगा होय. त्याच्या आकस्मित जाण्याने शोककळा पसरली आहे .
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.