loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

खेड (प्रतिनिधी) : रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे शुक्रवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, संविधानातील मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याच्या उद्देशाने शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रीमती गुहागरकर मॅडम यांनी उद्देशिका वाचनाचे नियोजन करून मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संविधानातील मूलभूत मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व याविषयी सामाजिक शास्त्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षिका मयुरी कारेकर, गीतांजली अप्पाला आणि तन्झीम तिसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण, पोस्टर निर्मिती, घोषवाक्य लेखन, प्रश्नमंजुषा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित आकर्षक पोस्टर तयार करून त्यांचे सादरीकरण केले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी आपली समज आणि विचार प्रभावीपणे व्यक्त केले. इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राऊत यांनी संविधानिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करताना नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदरभाव निर्माण करणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा देणे यावर त्यांनी भर दिला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमात करनिरीक्षक गायत्री माने, विस्तार अधिकारी संदीप कंदुरकर आणि उपअभियंता इम्रान शेख यांनीही सहभाग नोंदवला. विविध उपक्रमांचे छायाचित्रण करून शालेय अभिलेखासाठी पुरावे जतन करण्यात आले. छायाचित्रात्मक पुरावे संकलित करण्याची जबाबदारी मिनाक्षी गौडा यांनी पार पाडली. मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक शास्त्र विभाग आणि संबंधित शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी उपमुख्याध्यापक राहुल गाडबैल, शैलेश देवळेकर, तेजश्री कानडे, समन्वयक देवयानी महाजन, प्रितम वडके, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करून त्यांना आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव करून देणे आणि जागरूक, सुजाण व जबाबदार नागरिक घडविणे हा या संविधान दिन उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg