चिपळूण (ओंकार रेळेकर) महाराष्ट्र इंटकचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पुणे येथील पर्वती परिसरातील साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम, तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची फेरनिवड करण्यात आली.
अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र इंटकच्या जनरल कौन्सिलच्या सभेत या नेतृत्वाच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात या निवडीची घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग, मोहन जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या कामगारविरोधी चार श्रमसंहिता तसेच अन्य प्रलंबित प्रश्नांवर आगामी इंटकच्या राष्ट्रीय अधिवेशनात लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.कामगार हितविरोधी चार श्रमसंहिता तसेच महाराष्ट्र सरकारने भांडवलदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्र इंटकने वेळोवेळी रास्ता रोको, जेलभरो, निदर्शने आदी आंदोलनांच्या माध्यमातून कामगारांमध्ये दिलासा आणि एकजूट निर्माण केली आहे. या कार्याबद्दल केंद्रीय इंटक अध्यक्षांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्र इंटकच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला.
राज्यस्तरीय अधिवेशनात कामगारांच्या विविध प्रश्नांवर एकूण १३ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये चार श्रमसंहिता व कामगारविरोधी धोरणे रद्द करून कामगारांचे हक्क सुरक्षित करणे, महागाई भत्ता, सामाजिक सुरक्षा व सन्मानजनक जीवनमानाची हमी देणे, कंत्राटीकरण व सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण रद्द करून रोजगार अबाधित ठेवणे, असंघटित, कंत्राटी व स्थलांतरित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन देणे, बेरोजगारी निर्मूलन व युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, समानता व कामगारांच्या सुरक्षिततेची हमी देणे, पेन्शनमध्ये वाढ करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांबाबत धोरणात्मक भूमिका घेणे, एसटीतील कंत्राटी पद्धत रद्द करणे, गिरणी कामगारांचे प्रलंबित वेतन त्वरित देऊन घरांचा प्रश्न मार्गी लावणे, सार्वजनिक भूखंडांचे खासगीकरण थांबवणे तसेच केंद्र सरकारचे सार्वजनिक उद्योग, सरकारी उपक्रम व राष्ट्रीय संपत्तीच्या खासगीकरणाचे धोरण थांबवणे, अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्र इंटकचे कार्यकारी सदस्य निवृत्ती देसाई,विशाल पाटील,जी. बी. गावडे, मुकेश तिगोटे, दिवाकर दळवी, बजरंग चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.