loader
Breaking News
Breaking News
Foto

तोरसोळे सड्यावर आगीचे तांडव; आंबा बागांचे लाखोंचे नुकसान!

देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील तोरसोळे सडा येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास आंबा कलम बागेला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत राजेंद्र हिंदळेकर यांच्या आंबा बागेतील १०० हून अधिक कलमे जळून खाक झाली आहेत. तसेच त्यांच्या शेजारील जुवाटकर यांच्यासह अन्य बागायतदारांच्या आंबा कलमांनाही आगीची झळ बसली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दुर्घटनेत बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरुवारी दुपारी अचानक आगीचा भडका उडाल्याने परिसरातील आंबा बागांमध्ये आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता वाढत गेल्याने अनेक आंबा कलमे जळून खाक झाली. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन जोपासलेल्या आंबा कलमांचे डोळ्यादेखत नुकसान झाल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे तोरसोळे परिसरातील आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg