रत्नागिरी (जमीर खलफे) - सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन सुदेश पवार याची ३१ व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे सैतवडे परिसरासह शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू येथे १ ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत ३१ वी सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जम्मू येथील एम. ए. स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडणार असून, जम्मू-काश्मीर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या सचिव डॉ. साइमा सिद्दीकी यांनी दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे आर्यन पवारच्या निवडीची माहिती शाळेला दिली आहे. महाराष्ट्र संघ २८ नोव्हेंबर रोजी नागपूर येथून जम्मूसाठी रवाना होणार आहे. आर्यनच्या या निवडीमुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून, सैतवडे गावासाठीही ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
आर्यनचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आर्यनने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.